१५६ गटांचा समावेश; मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि क्रियाशक्ती निर्माण होण्याच्या उद्देशाने केएलई संस्थेचे जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात ‘चंद्रावर विजय मिळविण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम’ या घोषवाक्याला अनुसरून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रज्ञान-२ या कार्यक्रमाचे करण्यात आले होते. महाविद्यालयीन विभागात
बेळगाव केएलई संस्थेच्या निपाणीतील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. तर अथणी येथील केएलई संस्थेचे एसएसएस कॉलेजने द्वितीय, हुबळी येथील पी.सी. जाबीन कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून म्हाकवे येथील जूनियर कॉलेज आणि कोल्हापूर येथील न्यू कॉलेजने बक्षीस मिळवली.
स्पर्धांमध्ये शाळा विभागात प्रथमक्रमांक द फोर्ब्स अकॅडमी गोकाक, द्वितीय क्रमांक चिखली इंग्लिश स्कूल चिखली, तृतीय क्रमांक गव्हर्नमेंट हायस्कूल शिरदवाड. उत्तेजनार्थ अनुक्रमेसात क्रमांक अक्कमहादेवी कन्नडा हायस्कूल संकेश्वर, गव्हर्नमेंट हायस्कूल शिरगाव, गव्हर्नमेंट हायस्कूल शिरदवाड, गव्हर्नमेंट हायस्कूल शिरगाव, ए. एस. पाटील हायस्कूल स्तवनिधी,गव्हर्नमेंट हायस्कूल येडूर यांनी बक्षीसे पटकावली.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केएलई संस्थेचे संचालक प्रवीण बागेवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्थानिक कार्यकारी मंडळाचे सदस्य रवींद्र शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. देवचंद महाविद्यालय अर्जुननगरचे डॉ. भरत पाटील, यु. आर. पाटील, जी.एफ.जी.सी. रायबाग महाविद्यालयाचे प्रा. पी. आर. कागे, मल्लिकार्जुन यादवाड, कंपोझिट पी.यू. कॉलेज रायबागचे प्रा. एस.एस. शिंत्रे आणि न्यू इंग्लिश स्कूल सौंदलग्याचे निवृत्त शिक्षक एस.डी. कुंभार परीक्षक म्हणून लाभले. विज्ञान प्रदर्शनात शाळा आणि महाविद्यालय मिळून १५६ गटांचा समावेश होता. एकूण ३१२ विद्यार्थ्यांसोबत शाळा, महाविद्यालयाचे ७० शिक्षक आणि प्राध्यापक वर्गांनी उपस्थिती दाखवली.
यावेळी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या एच. डी. चिकमठ, पदवी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी, डॉ. श्रीपती रायमाने, आयोजक विशाल चौगुले, निमंत्रक अश्विनी किल्लेदार यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta