निपाणी (वार्ता) : येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी व खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वच्छेने रोटरी क्लब मध्ये रक्तदान केले.
यावेळी ३० खेळाडूंनी रक्तदान केले. क्लबच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेचे आयोजन, शालेय मैदानाची स्वच्छता, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे नेहमीच आयोजन केले जात असल्याचे हिंदवी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. यावेळी महादेव शिंत्रे, आसिफ मुल्ला, राजू मगदूम, सुरज माने, तोमेश्वर होनमाने, समीर मुजावर, किरण पाटील, दादासाहेब हळवणकर, राजू जमादार, लखन म्हैशाळे, संतोष पाटील, रणजीत मगदूम, प्रकाश माने, शुभम नागेश, धनंजय पुंडे, साहिल आवटे, प्रथमेश सौंदलगेकर, निखिल लोहार, विनोद यादव, अजित तिबिले, विश्वास पाटील, पप्पु पाटील, विशाल जाधव, अमोल माळी, संजय खापे, संजय दबडे, इम्रान अत्तार, विवेक माने, सागर पाटील यांच्यासह खेळाडूंनी रक्तदान केले. यावेळी रोटरी क्लबचे सुबोध शाह, आनंद सोलापूरकर, डॉ. पवन रुत्तनावर, सचीन देशमाने व नंदकुमार मोहिते, वनिता पोटजाळे, पुजा कुंभार यांचे सहकार्य लाभले.