निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ सन्मती विद्यामंदिर येथे संस्थेचे संस्थापक गुरुदेव १०८ समंतभद्र महाराज यांची १३२ वी जयंती आणि वार्षिक क्रीडा पार पडल्या.
शितल पाटील यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये हिरीरीने भाग घेऊन खेळांचे प्रदर्शन केले. नंतर कब्बडी व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अक्कोळ सीआरसीचे सीआरपी सुतार व प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक मगदूम व शिक्षक पवार महिपती यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक जे. आर. देसाई, पी. एम. तोटद, एस. के. मगदूम यांनी विशेष परिश्रम घेतले.
सन २०२३ -२४ शैक्षणिक वर्षातील लोवरग्रेड व हायर ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत सन्मती विद्यामंदिर मधील सात विद्यार्थी उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी चित्रकला शिक्षक ए. बी. नेजे यांचे मार्गदर्शन लाभले. जयंतीनिमित्त विज्ञान व गणित विषयाची प्रश्नमंजुषा स्पर्धा एस. बी. बेळगुदरी व एस. एन. रायनाडे यांनी आयोजित केल्या होत्या. त्यातील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, राजू पाटील, मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. एस. एन. रायनाडे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले.