निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील जय गणेश मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा संस्थेचे संस्थापक अभय मगदूम तर उपाध्यक्षपदी सचिन रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. पुजारी हे होते.
संघाच्या संचालक मंडळ निवडीत चार नव्या चेहऱ्यांना संधी देत सर्वच जागेची अविरोध निवड झाली. अध्यक्ष अभय मगदूम म्हणाले, शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रकाश हक्केरी यांच्या खंबीर साथीने व सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार गणेश हुक्केरी, सहकाररत्न उत्तम पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या सहकार्याने या संघाची स्थापना झाली. पाठबळामुळेच या संघाची प्रगती होऊन आपली पुन्हा अध्यक्षपदी वर्णी लागल्याचे सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक संतोष हंचनाळे यांनी स्वागत केले.
यावेळी उपाध्यक्षपदी सचिन रोड्ड, संचालकपदी राजगोंडा पाटील, अरुण बोने, रावसाहेब सवाडे, राजेंद्र फिरगनावर, कुणाल वठारे, मौला मुजावर, संजय ऐदमाळे, रोहिणी फिरगनवर, सन्मती हंजे, दिलीप गोसावी, सचिन महाजन, सल्लागारपदी इलाई मकानदार, बाहुबली फिरगणवर, अनिल मगदूम, तुळशीदास वसवाडे, राजू बल्लोळे, बिरू हांडे, बाबासाहेब मगदूम, राजू शिंगे, आकाश वड्डर यांची निवड करण्यात आली.