Wednesday , March 4 2026
Breaking News

रुग्ण सापडूनही निपाणीकर बिनधास्त

Spread the love

प्रशासनाकडून उपायोजना नाही : शाळा बंद बार सुरू
निपाणी (वार्ता) : शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला असून एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे निपाणीत गेल्या तीन-चार दिवसांत रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचार्‍यांसह अन्य एकाच कोरोनाची लागण झाली. तीन दिवसांपूर्वी प्रतिभा नगर येथील 36 वर्षीय महिलेला कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. दोन कोरोना प्रतिबंधक डोस घेवूनही कोरोनाची लागण झाली आहे. तर साईशंकर नगर येथील 33 वर्षीय महिला बाधित झाली होती. निपाणीशहर पोलीस स्थानकातील 29 वर्षीय पुरुषास, बिरोबा माळ पंतनगर येथील 26 वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा वाढत असला तरी निपाणी प्रादुर्भाव याबाबत प्रशासनाकडून कोणतीच दक्षता घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
निपाणीत विनामास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व अन्य महामारीच्या नियमांचे कोठेही पालन होत असल्याचे दिसून येत नाही. कोरोनाचा शिरकाव होवून या विषाणूचा प्रादुर्भाव सार्वत्रिक होण्याआधी प्रशासनाने जागरूक राहून कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नाईट कर्फ्यूमुळे रात्री 10 नंतर सर्व व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र कांही दुकाने, वाईन्स, हॉटेल बेधडकपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक शासनाने नाईट कर्फ्यूचा कालावधी वाढविला असून 19 जानेवारीपर्यंत असणारा नाईट कर्फ्यू पूर्ण जानेवारी महिनाभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते 9 वी पर्यंतच्या सुट्ट्या जाहीर शाळांनाही केल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *