
निपाणी (वार्ता) : वाळकी (ता.चिकोडी) येथे दोन शेतकऱ्यांच्या वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीना आग लागल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाचच्या प्रसंगावधानामुळे परिसरात असलेली घरे आगीपासून बचावली.
याबाबत अधिक माहिती अशी, वाळकी गावातील दलित वसाहत परिसरात सिद्धार्थ बसाप्पा सुतार व नरसू रामा नाईक यांनी आपल्या जनावरांच्या पावसाळी चाऱ्यासाठी गवत व इतर चाऱ्याची एका ठिकाणी साठवणुक केली होती. रविवारी सायंकाळी अचानकपणे दोन बडमींना आग लागली. यावेळी आगीची घटना लक्षात आल्याने नागरिकांसह अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिसरातील घरे आगीपासून बचावली. यामध्ये सिद्धार्थ सुतार व नरसु नाईक यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. याबाबत सुतार व नाईक यांनी निपाणी अग्निशामक दलात याबाबत तक्रार नोंद केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta