निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील माळी गल्लीतील महादेव मंदिरात शुक्रवार (ता.१) ते शनिवार (ता.९) अखेर महाशिवरात्री उत्सव सोहळा व सत्संग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महादेव मंदिर कमिटी, बसवेश्वर क्रीडा युवक मंडळ, बसव ग्रुप, आक्कमहादेवी अक्कन बळग यांच्या संयुक्त विद्यमानाने
विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन कमिटी कडून देण्यात आली.
सप्ताहात गुरुदेव आश्रम कृष्णा कित्तूर येथील बसवेश्वर स्वामींचे प्रवचन, विजापूर येथील ज्ञान योगाश्रमचे बसवलिंग स्वामींचे
प्रवचन व काडसिद्धेश्वर मठ जारकीहोळी येथील कृपानंद स्वामींचे प्रवचन होणार आहे.
शुक्रवारी (ता.८) महा शिवरात्री निमित्त सौभाग्य कुंभोत्सव, पालखी मिरवणूक सोहळा व रुद्राभिषेक होणार आहे. सकाळी १० वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. बेंगलोर येथील
राष्ट्रपती पुरस्कार विजेते बसवराज मगदूम यांचे ‘सेंद्रिय शेती आणि देशी गोपालन व संरक्षण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.