निपाणी (वार्ता) : ढोणेवाडी आणि परिसरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा झाला. ढोणेवाडीत आयोजित कार्यक्रमास कर्नाटक राज्य रक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आप्पा महाराजांच्या मठात आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी राजू पोवार यांनी आपला सहभाग नोंदवून स्वतः अभंगाचे एक चरण घेऊन आपला धार्मिक बाणा दाखवून दिला.
राजू पोवार यांनी, ओळख पत्राचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमास निपाणी तालुका रयत संघटना उपाध्यक्ष बबन जामदार, चांद शिरदवाड शाखाध्यक्ष सागर हवले, विश्वास नलवडे, ढोणेवाडी शाखाध्यक्ष सुभाष खोत, राजू कोपर्डे, एकनाथ सादळकर, दादासो रोकडे, राजाराम घाटगे, मयूर पाटील, एस. एम. माळी, प्रकाश सादळकर, डॉ. अनिल सदलगे , प्रशांत कांबळे, यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.