निपाणीत होम मिनिस्टर स्पर्धा ; १०० पेक्षा अधिक महिलांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत पूजा प्रमोद शेलार यांनी पैठणी पटकावली.
श्रुती संदीप मुत्तगी यांनी दुसऱ्या क्रमांकाची चांदीची समई आणि शितल संजय घाटगे यांनी तिसऱ्या क्रमांकाची एलईडी टीव्ही पटकावली. लक्ष्मी सुभाष माळकरी यांनी चौथ्या क्रमांकाची शिलाई मशीन तर सोनाली विशाल कानडे यांनी पाचव्या क्रमांकाची मिक्सर मिळवली.
माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, मल्लिकार्जुन गडकरी, रविंद्र कोठीवाले, अनिल पाटील, रविंद्र शेट्टी, संजय मोळवाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत शंभर पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. संगीत खुर्ची, फुगे फुगवणे, उखाणे, तळ्यात -मळ्यात अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
कार्यक्रमास नगरसेविका गीता पाटील, सुलोचना पाटील, उज्वला चौगुले, सविता शेट्टी, पुष्पा कुरबेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, प्रतिभा पाटील, रूपाली कोठीवाले, वैशाली कोठीवाले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.