निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव व कारवार लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी पार पडली.
यावेळी बोलताना अजितदादा पाटील म्हणाले, सीमाप्रश्नाशी आम्ही बांधील आहोत याची जाणीव ठेऊन कारवार व बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडून आणण्यासाठी सर्व मराठी भाषिक लोकांनी प्रचार करून आपली ताकत दाखवायची ही संधी मराठी लोकांना चालून आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत याची जाणीव आम्हाला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काम करताना निपाणीमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला ज्यावेळी मार्गदर्शनाची आवश्यकता असते त्यावेळी महत्वाचा सल्ला आम्हाला मिळतो. मध्यवर्ती समितीने दिलेले अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आमचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी आनंदा रणदिवे म्हणाले, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उभे केलेले उमेदवार निवडून आले पाहिजेत व मराठी भाषिक लोकांची ताकत कर्नाटक सरकारला समजून येणार आहे, एकजुटीने प्रचार केला तर आमचे दोन्ही निवडून येतील यामध्ये काहीच शंका नाही, ही निवडणूक मराठी भाषिकांच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे.
यावेळी नेताजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले रात्र वैऱ्याची असून आताच खरी कसोटी आहे. मराठी उमेदवार निवडून यावेत अशी प्रामाणिक इच्छा आमच्या सर्वांची आहे.
यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष अजितदादा पाटील, उपाध्यक्ष संतोष निढोरे, सरचिटणीस अमोल शेळके, अमर ढगे, शिवाजी पाटील, मतिवडे, कुर्ली, निपाणी, सौन्दलगा, कोगनोळी इत्यादी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.