Tuesday , March 3 2026
Breaking News

बेनाडीत बिरदेव यात्रेनिमित्त भविष्यवाणीसह पालखी मिरवणूक; महाप्रसादाचे वाटप

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात रविवारी (ता.१२) करण्यात आली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भाविक उपस्थित होते.
शनिवारी (ता.११) सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील भाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री आठ वाजता सिध्देश्वर देवालयात वालंग जमवून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढली. रविवारी सकाळी ११ वाजता श्रींच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून ढोल वादनामध्ये मिरवणूक काढली. सायंकाळी ५ वाजता वाघापूर येथील भगवान ढोणे महाराजांची भविष्यवाणी झाली.
यात्रेसाठी वालंग घेऊन येणाऱ्या प्रत्येक ढोलास १०१ रूपये व मानाचा फेटा व बक्षीस देण्यात आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष अविनाश हजारे, कल्लाप्पा भानसे, पुंडलिक ढवणे, आप्पासाहेब बन्ने, मायाप्पा बन्ने, अण्णा हजारे, सत्याप्पा हजारे, जकाप्पा हजारे, लक्ष्मण जानकर, भीमा रानगे, वासू रानगे, कल्लाप्पा कोरे, मारुती लवटे एस. एस. हजारे, दत्ता लवटे, अप्पासाहेब हजारे, महादेव लवटे, नवलकुमार ढवणे, भागोजी बन्ने यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
——————————————————————–
सीमाभाग चर्चेत राहील
पावसाचे प्रमाण कमी जास्त असून अवेळी पाऊस पडेल. नवनवीन रोग झपाट्याने वाढतील. साखरेचे दर कमी होऊन गुळाचे दर वाढतील. कोरोना नष्ट होऊन सीमाभाग चर्चेत राहील. अपघातांचे प्रमाण समान नागरीक कायदा अस्तित्वात येईल. महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प होईल, यासह समाजातील विविध घडामोडीवर वाघापूर येथील ढोणे महाराज यांनी भाकीत केले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *