Friday , April 17 2026
Breaking News

कोगनोळीजवळ अपघात; एक ठार, एक जखमी

Spread the love

 

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर टोलनाक्याजवळील मत्तिवडे फाट्यावर मोटरसायकल अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी नऊ वाजता घडली.
प्रताप बाळू पाटील (वय 27) राहणार पेंढाखळे तालुका शाहूवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून प्रसाद नाईकवाडे हा युवक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रताप पाटील व प्रसाद नाईकवाडे निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने मोटर सायकलवरून जात होते. येथील महामार्गावरील टोलनाक्याजवळ असणाऱ्या मतिवडे फाट्याजवळ आले असता गाडीवरील नियंत्रण सुटून दुचाकीची मधील दुभाजकला धडक बसली. यावेळी प्रताप पाटील यांचे डोके दुभाजकाच्या कठड्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले प्रसाद नाईकवाडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
शासकीय 108 रुग्णवाहिकेतून त्यांना कोल्हापुर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे सांगितले. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एस ए काडगौडर, कोगनोळी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार शिवप्रसाद किवडण्णावर, पोलिस तळवार यांनी भेट दिली.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *