निपाणी (वार्ता) : उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि शिक्षिका अपूर्वा चौगुले दांपत्याने उत्तर कार्याला १२५ रोपे वाटप करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजाला नवा आदर्श मिळाला आहे.
यरनाळ येथील कमल रामचंद्र वास्कर यांचे निधन झाले. निपाणी येथील विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका अपूर्वा नामदेव चौगुले यांच्या त्या मातोश्री तर पर्यावरण प्रेमी, तंत्रस्नेही शिक्षक नामदेव चौगुले यांच्या सासूबाई होत्या.
उत्तर कार्याच्यादिवशी चौगुले दांपत्याने पर्यावरणपूरक उत्तरकार्य करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी तानाजी पाटील, रमेश देसाई, दत्तात्रय गोरे, मारुती पाटील, रामचंद्र वास्कर, रणजीत गोरे, प्रतिभा पाटील, योगेश शिंदे, माया वास्कर, वसंत वांगळे, ज्योतिबा लकमले यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta