यरनाळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा :आठवणींने शिक्षकही गहिवरले
निपाणी (वार्ता) : लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सगळे जण जपून ठेवतात तशाच आठवणी यरनाळ येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी शिक्षकांसोबत जाग्या केल्या. निमित्त होते मराठी शाळेतील २००२ २००३ सालातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.
तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात एकमेकांशी सुसंवाद साधला.
प्रारंभी पुष्यवृष्टी करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी शितल सुतार, सिमा संपाळ, अस्मिता मोळके, सरिता मोलके, अमित डावरे, धनाजी घाटगे, अर्चना डावरे, विनोद भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शोभा मोरे, रेणुका पोवार, दिपाली पोवार, विद्या शेंडे, अमर गुरव यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. संपदा संपाळ यांनी स्वागत केले. संतोष गुरव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta