निपाणी (वार्ता) : वादळी वारे आणि पावसामुळे शहरांसह परिसरातील अनेक घरासह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तात्काळ मदत म्हणून अरिहंत उद्योग समूह, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता.२४) १९ जणांना मदतीचे धनादेश देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. सुभाष जोशी उपस्थित होते.
ओंकार शिंदे यांनी स्वागत तर सचिन फुटाणकर यांनी प्रस्ताविक केले. सहकारत्न उत्तम पाटील यांनी, काही वर्षापासून निसर्गाचा विकोप होऊन अतिवृष्टी, महापूर, दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे. या काळात नैतिक जबाबदारी जाणून राजकारणा पलीकडे जाऊन आर्थिक मदत केली जात आहे. कोरोना काळातही अनेक गावांना मदतीचा हात दिला आहे. आता संस्थेतर्फे तात्काळ मदत केली असून पालकमंत्र्यांना भेट देऊन जास्तीत जास्त मदत देण्याचे आवाहन केल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, नगरसेवक शेरू बडेघर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना भारताचे धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमास राजू पाटील-अक्कोळ, नगरसेवक संजय पावले, शौकत मनेर, दीपक सावंत, दिलीप पठाडे, दत्ता नाईक, निरंजन पाटील- सरकार, इम्रान मकानदार, शिरीष कमते, राजेंद्र कंगळे, शशी कुमार गोरवाडे, सुनील शेलार, अनिल संकपाळ, ओंकार शिंदे, मज्जिद सय्यद, संजय पाटील, पप्पू शिंदे यांच्यासह नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते.