चिक्कोडी : चिक्कोडी परिसरात गुरुवारी रात्री विज कोसळून दोन शेतकरी व 12 मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत.
हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात वीज पडून गुरु पुंडलिक (३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले. जखमींवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकेश्वर शहराच्या हद्दीत वीज पडून 12 मेंढ्यांचा मृत्यू झाला. संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपास केला.
दुसरीकडे, रायबागजवळ शेतकरी महिला शोभा कृष्णा कुलगोडे (45) यांचा मृतदेह आढळून आला. मल्लप्पा शंकर मेत्री, भारती केम्पण्णा कामते, बाबुराव अशोक चौहान, प्रवीण कल्लाप्पा धर्मट्टी हे गंभीर जखमी झाले. त्यांना रायबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रायबाग पोलिस तपास करत आहेत.