Monday , December 8 2025
Breaking News

निपाणीत दुचाकी चोरट्यासह मुद्देमाल जप्त

Spread the love

निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. अखेर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यामध्ये बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. त्यामध्ये आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत. इतर सोन्या-चांदीच्या वस्तूसह 3 लाख 46 हजार 688 रुपयाचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहर व परिसरात वाढलेल्या दुचाकी संदर्भात पोलिसांनी आरोपीवर नजर ठेवली होती. त्यानुसार चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज येलीगार यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचार्‍यांनी सापळा रचला होता. त्यानुसार गस्त घालतेवेळी ओंकार रमेश निकम (वय 24 रा. कामगार चौक निपाणी) हा संशय व्यक्त करत असताना पोलिसांनी त्याला हटकले. त्याची चौकशी केली असता सदरचे दुचाकी स्वत:ची नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरची दुचाकी चोरीची असल्यावरून त्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानुसार त्याच्यावर बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये एकूण आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत 1 लाख 71 हजार इतकी आहे. घराच्या चोरी प्रयत्नातून 3.5288 ग्रामचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी रवी कुंभार, प्रकाश सावजी, मुताना तेरदाळ, मारुती कांबळे, श्रीशैल मळवली, रघु मेलगडे, रामगोंडा पाटील, शेखर असोदे, उदय कांबळे, पोपट खानापुरे, अमर चंदनशिवे यांनी सहभाग घेतला.

 

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *