निपाणी (वार्ता) : शहरातील दक्षिण प्रवेशद्वार समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील स्क्रॅप विमान तात्काळ हटवावे. त्यामधे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करून नागरिकांसाठी उद्यान खुले करावे, अशा आशयाचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना चिक्कोडी काँग्रेस कमिटी व निपाणी ब्लॉक कमिटीतर्फे देण्यात आले
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, चिक्कोडी जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रतीक शहा, शासन नियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर, ॲड. संजय चव्हाण, फारुक गवंडी, उद्योजक दिपक वळीवडे, युथ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रोहित यादव, निपाणी युथ काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव, एसीसेल अध्यक्ष सुशांत खराडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta