निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत जनस्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समस्याबाबत नागरिकांनी शहर व तालुक्यातील विविध संघटना, नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिली. माणकापूर पॉवरलूम असोसिएशनतर्फे वीज दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, विणकारांची थकीत वीज बिले माफ करावीत. २० अश्वशक्ती पर्यंत मोफत वीज पुरवठा करावा. विणकारांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे. निरंतरपणे वीज पुरवठा करावा, यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा काँग्रेस गॅरंटी जिल्हा उपाध्यक्ष अमोल बन्ने, अर्जुन कुंभार-लष्करे, ईरगोडा, जिगन महादेव स्वामी, महावीर धरणगुते, बाळु कैलवे, लक्ष्मण कदम यांच्यासह मानकापूर पॉवरलूम असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य व यंत्रमागधारक उपस्थित होते.