उपनिरीक्षिका उमादेवी; महिला मुलींसाठी आपत्कालीन माहिती
निपाणी(वार्ता) : महिला व मुलींनी कुणल्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेऊ नये. कोणावरही अन्याय होत असल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. महिलांनी घर सांभाळत समाज आणि राष्ट्राची जबाबदारी घेतली पाहिजे. यासाठी आमच्याकडून आपल्याला सर्व सहकार्य मिळेल, अशी ग्वाही शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांनी दिली. केएचपीटी स्फूर्ती प्रोजेक्टतर्फे महिला व मुलींच्यासाठी पोलीस स्टेशन आणि अग्निशामक दलाच्या कामाविषयी माहिती देण्यात आली. त्यावेळी उमादेवी बोलत होत्या.
अग्निशामक दलाचे अधिकारी यल्लाप्पा कौजलगी यांनी, घरगुती अपघात झाल्यास महिलांनी प्रमुख भूमिका घेऊन पुढाकार घ्यावा. त्यामुळे समाजातील अनेक अपघात घडण्यापासून रोखणे शक्य होणार आहे. पण आपत्काळी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती महिलांना माहिती नसल्याने मोठे अपघात घडत आहेत. असे उपक्रम इतर महिला मंडळांनी राबविण्याचे आवाहन केले. पोलीस निरक्षिका उमादेवी यांनी महिलांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती दिली.
याप्रसंगी स्फूर्ती प्रोजेक्टचे प्रमुख विनायक चौगुले, हवालदार केंपण्णावर, श्रीशेल होसमनी, अग्निशामक दलाचे उदय पट्टण, रवी हेगडे, सुमित्रा मिरजे, लक्ष्मी दोडमनी, स्मिता हेब्बाळ, श्वेता हिरेमठ, सोमय्या हंदिगुड्ड, जया पटेल, सुमन हंदिगुड्ड, राजश्री मगदूम, अनुश्री हुंचली, सुहाना मुल्ला त्यांच्यासह परिसरातील मुली व महिला उपस्थित होत्या. सागर श्रीखंडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta