Monday , September 21 2026
Breaking News

वर्षीही दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी

Spread the love

 

बेळगाव : सध्या पावसाळा सुरु आहे. या हंगामात लोक वर्षा विहारासाठी जाण्याचा बेत आखतात. सध्या पर्यटकांचे आवडीचे ठिकाण दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन वर्षात या धबधब्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन, आणि वन विभागाने पावसाळा कमी होई पर्यत या धबधब्यावर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रेल्वे या ठिकाणी थांबते. काही अति उत्साही प्रवासी या धबधब्यात उतरतात. रेल्वे प्रशासनाने दूधसागर रेल्वेस्थानकावर कोणीही उतरू नये अशी सूचना दिली आहे. नियमाचा उल्लन्घन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *