ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये एनएसएस शिबिराचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : एनएसएस शिबिरांमुळे युवकांच्यात कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. याशिवाय समाजात वेगळ्या प्रकारचे जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील यांनी केले. चिखलव्हाळ येथे राणी चन्नम्मा विश्वविद्यालय आणि केएलई संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालया तर्फे चिखलव्हाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते.
अध्यक्ष प्राचार्य एम. एम. हुरळी होते.
प्राचार्य हुरळी म्हणाले,आजच्या धावत्या युगात समाजासाठी राष्ट्रीय सेवा योजनचे कार्य उपयोगी पडणार आहे. शिबिरार्थीनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यातून स्वतःचे जीवन घडवण्याचा मार्ग शोधावा. चिखलव्हाळ गावातील सर्व नागरिक सहकार करणारे आहेत. त्यांच्यासोबत सात दिवस राहुन ग्रामीण जीवनाचे ज्ञान प्राप्त करा. सेवा करून त्यांची मन जिंकून प्रेम एकमेकांशी कसे राहायचे हे समजून घ्यावे.
चिखलव्हाळ येथील प्राथमिक शाळेच्या आवारात शिबिराचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाधिकारी डॉ. श्रीपती रायमाने यांनी, गेल्या चार-पाच वर्षात एनएसएस घटकाकडून केलेल्या कार्याची दखल घेऊन राणी चन्नम्मा विद्यापीठाने सतत बेस्ट एनएसएस युनिट अवॉर्ड, एनएसएस ऑफिसर अवॉर्ड बेस्ट एनएसएस अवॉर्ड हे अवॉर्ड प्राप्त
झाले आहे. ते फक्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात प्रामाणिक वृत्ती आहे. त्यामुळे हे कार्य मला करणे सोपे पडत आहे. चिखलव्हाळ मधील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य असेच लाभू दे, असे सांगितले.
शिबिरात वृक्षारोपण, खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण, आरोग्य विषयक जागृती शैक्षणिक जागृती स्वच्छता अभियान, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जनावर तपासणी शिबिर, ऐतिहासिक मंदिरांची स्वच्छता, डेंगू, एड्स, चिकनगुनिया याबद्दल जागृती रॅली, अंधश्रद्धा याबद्दल वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कार्यक्रमास आसिफ पठाण ग्रामविकास अधिकारी संजीव पाटील, सेक्रेटरी प्रकाश इंगळे, महेश पाटील, सुशांत सटाले, संतोष साळुंखे, रामचंद्र गडकरी, एस. एस. कदम, एस. बी. चौगुला, रामचंद्र बन्ने, संजयकुमार इंगळे, विजय पाटील, रावसाहेब पाटील, देवानद चव्हाण, उपप्राचार्य आर. जी. खराबे, डॉ. अतुलकुमार कांबळे, चैत्रा कौलापुरे उपस्थित होते.
साक्षी आणि निकिता यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. सुधीर कोठीवाले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta