निपाणी (वार्ता) : आडी येथील संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी ‘आनंद सोहळा’ पंढरपूर दिंडी आडी येथून वारकरी आणि माळक-यांच्या उपस्थितीत रवाना झाली. त्यानिमित्त टाळ, मृदंग आणि माऊली माऊलीचा गजर झाला.
सकाळी केरबा गुरव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर परमात्मराज महाराज आणि रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते पायी दिंडी सोहळ्याचे उद्घाटन झाले. परमात्मराज महाराज यांनी, आयुष्यात येऊन एकदा तरी पंढरीची पायीवारी अनुभवावी. या वारीमुळे सुख समाधान आणि शांती मिळत असल्याचे सांगितले. राजू पोवार यांनी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आयुष्यात आचरणात आणल्यास जीवन सार्थकी लागणार असल्याचे सांगितले. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडीची मिरवणूक काढून बेनाडीमार्गे पंढरपूरकडे रवाना झाली.
दिंडीत व्यासपीठ चालक ज्योतीराम बोंगाडे महाराज, संताप पाटील सखाराम साळुंखे, बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील, आप्पासाहेब केरके, शेखर उपासे, अनिल पाटील, शेखर पाटील, विकास गुरव, नामदेव साळुंखे, शहाजी हरेर, बाबासाहेब बागणे, महेश पाटील, मलगोंडा पाटील, शालन पाटील, शोभा पाटील, सिद्धव्वा बन्ने, महादेवी पाटील, मायाक्का पडवाळे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.