Monday , September 21 2026
Breaking News

सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांची निपाणी तालुका समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

Spread the love

 

निपाणी : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष श्री. धैर्यशील माने यांची तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व सुरवातीला समस्त सीमाभाग मराठी भाषिक जनतेच्या वतीने खासदार माने यांचे खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व सीमा महाचिंतन शिबिर महामंथन शिबिर आयोजित करून यामध्ये विद्यापीठातील प्रमुख व्यक्ते ज्येष्ठ साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार, प्रमुख वक्ते, महाराष्ट्रातील आमदार खासदार, सीमाभागातील बेळगांव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, येथील महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व संघटना यांना आमंत्रित करून मोठे चिंतन शिबिर आयोजित करण्यासाठी माननीय खासदार धैर्यशील माने यांनी अनकुल प्रतिसाद दाखविला. तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका जो मुळ दावा आहे त्याला गती लावण्यासाठी आपल्यापरीने नियोजन करावे यासाठी पदाधिकारी यांनी निवेदनाच्या वतीने विनंती केली.

यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. अजित पाटील, कार्याध्यक्ष बंडा पाटील, खजिनदार व प्रवक्ते नेताजी पाटील, संतोष निढोरे, गणेश माळी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *