निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची श्री. दत्त संस्थानचे बाळेकुंद्री ट्रस्टी व अक्कोळ येथे तीन पिढ्या वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणारे डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, अकोळ यांच्या निवासस्थानासह हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी पंत बाळेकुंद्री महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन व आशीर्वाद घेतला.
अक्कोळ हे श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या पदस्पर्शासह वास्तव्याने पुनीत झालेले गाव आहे. त्यांचे पणतू डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री व कुटुंबीयांचे येथे वास्तव्य आहे. गेल्या तीन पिढ्या शतकोत्तर काळ वैद्यकीय सेवेत झोकून देणाऱ्या या कुटुंबास व या गावाला मुश्रीफ यांची भेट द्यायची खूप इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सदिच्छा भेट दिली. पूर्वीचा इतिहास ऐकून हसन मुश्रीफ भारावून गेले होते. यावेळी पंतबाळेकुंद्रीकर कुटुंबीयातर्फे मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश कुलकर्णी, श्रीपती सूर्यवंशी, पोपट सांगले-मुगळी, अनंत पोवार- लिंगनूर, चंद्रकांत पाटील- कौलगे, नारायण शेटके- कुरुकली, राहुल देसाई-अर्जुनी यांच्यासह मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta