निपाणीत सोहळा : ३४ वर्षांनी वर्गमित्र जमले एकत्र
निपाणी : तब्बल ३४ वर्षानंतर व्हीएसएम. जी आय. बागेवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. १४ रोजी उत्साहात पार पडला.
निपाणीतील संगम पॅराडाईज येथे दिवसभर झालेल्या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आप्पासाहेब केरगुटै उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर पोपट तिबिले यांचा कारगील युध्दातील सहभागाबद्दल तसेच देशसेवेबद्दल सत्कार करण्यात आला. आप्पासाहेब केरगुटै यांचा दिनेश पटेल यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी प्रास्ताविक उमेश शिरगुप्पे यांनी केले. स्वागत जयसिंग पारील यांनी केले.
सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आपापला परिचय देऊन सध्या करत असलेल्या नोकरी-व्यवसायाबद्दल माहिती दिली. इयता दहावीत १९९०-११ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते.
यावेळी सुधीर खाडे, पंढरीनाथ घाटगे, नीलेश शेट्ये, शीतल हांजे, राजू सूर्यवंशी, व्यंकटेश कुलकर्णी, गोपाळ इंगवले, प्रवीण घोडके, नंदू घोडके, अनिल पाटील, संजय खोत, प्रवीण पोळ यांनी नृत्य सादर केले.
कवी तथा गायक सुनील किरळे यांनी बहारदार गीते सादर केली. सूत्रसंचालन गजानन सूर्यवंशी यांनी केले. रावसाहेब निकम यांनी आभार मानले.