
निपाणी : निपाणी शहर हे बेळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून ओळखले जाते. निपाणी नगरपालिकेत एकूण 48 कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांचे मागील तीन महिन्यापासूनचे वेतन थकल्यामुळे या कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कामगारांच्या थकीत वेतनासाठी नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील कामगारांच्या या मागणीकडे निपाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज दि. 23 पासून कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत निपाणी नगरपालिका आयुक्त, तहसीलदार, आमदार, जिल्हा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दाखल घेऊन ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या दरम्यान निपाणी शहरात निर्माण होणाऱ्या असुविधा व समस्यांना सर्वस्वी नगरपालिका अधिकारी व प्रशासन जबाबदार असतील. त्यामुळे त्वरित थकीत वेतन देऊन कामगारांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी कामगारांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta