पोलीस उपनिरीक्षिका उमादेवी; प्रहार क्लबतर्फे व्याख्यान
निपाणी (वार्ता) : तरुण वर्गामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण व्याधीग्रस्त बनत आहे. त्यामुळे आधुनिक भारत निर्माण करायचा असेल तर तरुण वर्ग सशक्त व बलवान असणे आवश्यक आहे. त्याशिवाय भारत महासत्ता बनू शकत नाही, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांनी व्यक्त केले. अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेजमध्ये प्रहार क्लबतर्फे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
प्रा. डॉ. भारत पाटील यांनी प्रास्ताविक केले.
उमादेवी म्हणाल्या, निपाणी परिसरामध्ये व्यसनाधीनते प्रमाण वाढत आहे ही चिंतनीय बाब आहे. तरुण व्यसनाधीन होत असल्याने पूर्ण कुटुंब उध्वस्त होतेच. शिवाय समाज व देशालाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, योगासने विविध खेळ खेळावेत. त्यामुळे शरीर सुदृढ होऊन व्यसनाधीनते पासून आपण दूर राहतो. उज्वल भविष्य घडविण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षातून उत्तीर्ण होऊन विविध प्रकारची अधिकार पदे भुषवून समाजाचे नाव उज्वल करावे.
प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जन करावे. जीवनाची विविध कौशल्य आत्मसात करावीत. उज्वल भविष्य घडण्यासाठी विविध प्रकारची साधने महाविद्यालयात उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून जीवन यशस्वी बनवावे. व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्या एस. पी. जाधव, पर्यवेक्षक मेजर डॉ. ए. एस. डोनर, प्रा. यू. आर पाटील, प्रा. सचिन खोत, प्रा. बिपिन पाटील उपस्थित होते. प्रा. एम. पी. रानभरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राहुल घटेकरी यांनी आभार मानले.