निपाणी (वार्ता) : तवंदी गावाशेजारी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याजवळ हिंदू हेल्पलाईनचे कार्यकर्ते सुमित पाटील यांना वानर जखमी अवस्थेत आढळून आले. वानराला कुत्र्याच्या झुंडीचा त्रास होत होता. यावेळी सुमित पाटील यांनी कुत्र्याच्या झुंडीपासून वानराला सोडवून या वानराला सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यानंतर वैद्यकीय उपचार करून परिसरात सोडून देण्यात आले.
घटनेची माहिती पाटील यांनी हिंदू हेल्पलाईनचे सागर श्रीखंडे यांना संपर्क केला. यावेळी श्रीखंडे यांनी येथील वन खात्याच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. येथील सरकारी पशुैद्यकीय अधिकारी प्रतीक यांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संकेश्वर येथील वन अधिकारी राजू पाटील व कार्यकर्त्यांनी या कामी पुढाकार घेतला. वानरावर उपचार करून हायवे पेट्रोलच्या वाहनामधून संकेश्वर येथील वन खात्याच्या नर्सरीमध्ये पुढील उपचारासाठी घेऊन गेले. यावेळी अधिकारी राजू पाटील यांनी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली या वानरावर उपचार केले जातील. नंतर जंगलामध्ये सोडून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
हायवे पेट्रोलचे अधिकारी अक्षय सारपुरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी राजेंद्र गुरव, बाबासाहेब पाटील, राहुल कदम, सागर श्रीखंडे यांच्यासह हिंदू हेल्पलाइनचे कार्यकर्ते उपस्थित होते.