Friday , March 6 2026
Breaking News

आंतरराज्य दुचाकी चोरट्याला निपाणी पोलिसांकडून अटक

Spread the love

 

बेळगाव (वार्ता) : निपाणी पोलिसांनी एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला अटक करून 10 मोटरसायकली जप्त केल्या असून गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

निपाणी हालसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटरसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ गावात तीन महिन्यांत कर्नाटक आणि महाराष्ट्रातून काही दुचाकी चोरल्या होत्या. तर स्थानिक गुरांच्या बाजाराजवळ असलेल्या झुडपात सहा दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. त्यांची विक्री करण्याचा त्याचा इरादा होता. पोलिसांनी त्याच्याकडून 4.14 लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. सीपीआय बी. एस. तलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *