व्यवस्थेबाबत मंडळांना आदेश : सामाजिक विषयावर जनजागृती
निपाणी (वार्ता) : अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवा दरम्यान पोलिसांकडून मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात ३०० पोलिसासह होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मंडळाची दररोज तपासणी व्यवस्थेबाबतची चौकशी होणार आहे.
शहरात सुमारे १०० गणेशोत्सव मंडळाची तर ग्रामीण भागात ९०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी शुक्रवार (ता.६) पर्यंत झाली आहे. प्रत्येक मंडळाने जनजागृतीपर, देखावे सादर करावेत. याशिवाय प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक एकतेचे भान ठेवून हा उत्सव साजरा याशिवाय व रक्तदान आणि इतर सामाजिक कार्यक्रमांवर भर देण्याचेही निर्देश दिले आहेत. अति संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी वॉच टॉवर आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. अरुंद रस्ते असलेल्या परिसरात वाहतूक व्यवस्थित काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे.
बंदोबस्तासाठी मंडळ पोलीस निरीक्षक, सर्व ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल, साध्या वेशातील पोलीस, राज्य राखीव दलाचच्या तुकडीसह होमगार्ड मदतीला राहणार आहेत.
——————————————————————-
हुल्लडबाजांसाठी पथक
शहरातील विविध मंडळाजवळ युवकांसह तरूणी आणि महिला या देखावे पाण्यासह गणेश दर्शनासाठी येतात. यादरम्यान युवकांकडून हुल्लजबाजी होते. अशा ठिकाणी पोलिस विभागाकडून विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. इतर पथकेही सोबतीला असतील.
——————————————————————–
‘शहर उपनगर आणि ग्रामीण भागात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांच्या अधीन राहून हा उत्सव शांततेने साजरा करावा. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.’
– बी. एस. तळवार, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी