निपाणी (वार्ता) : बंगलोर येथील कर्नाटक छायाचित्रकार असोसिएशनचा राज्यपातळीवरील ‘छायाश्री’ पुरस्कार येथील तालुका छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर संघाचे सदस्य राजगौडा पाटील यांना देण्यात आला. बंगलोर येथील त्रिपुरवासीनी पॅलेस मैदानावर संघाचे अध्यक्ष एच. एस. नागेश यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
पाटील हे आर्ट मास्टर असून गेल्या पंचवीस वर्षापासून ते छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना तालुका पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बंगळूर छायाचित्रकार संघाचे राज्यकार्यदर्शी ए. एम. मुरळी, संचालक मल्लिकार्जुन के. आर., बेळगाव जिल्हा संघाचे अध्यक्ष बसवराज रामन्नावर, निपाणी तालुका अध्यक्ष नरेंद्र बाडकर, उपाध्यक्ष विनायक पाटील, सेक्रेटरी संजय सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta