डी. के. शिवकुमार : काकासाहेब पाटील यांनी घेतली भेट
निपाणी(वार्ता) : नुकत्याच विधानपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाले आहेत. काँग्रेस पक्ष संघटनेमुळे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी बेंगळूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी उभयंतामध्ये पुढील निवडणुकाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गेल्या काही निवडणुकांमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीसाठी निपाणी मतदारसंघात काँग्रेसकडून तयारी सुरु झाली आहे. त्याची माहिती देण्यासह निवडणुकांमध्ये पक्षाची वाटचाल ठरविण्यासाठी काकासाहेब पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास सर्वाधिक मते मिळाल्याबद्दल डी.के. शिवकुमार यांनी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सर्वांच्या सहकार्याने यश मिळाले आहे. यापुढील काळातही काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीस सामोरे गेल्यास निपाणी मतदारसंघासह राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास यावेळी शिवकुमार यांनी व्यक्त केला. याशिवाय बेळगाव जिल्ह्यासह निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बळकटीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta