Saturday , June 6 2026
Breaking News

निपाणी महादेव मंदिरात २६ पासून महाशिवरात्रोत्सव

Spread the love
विविध स्पर्धा शर्यती रद्द : रांगोळीतून १२ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती
 निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली येथील पुरातन श्री महादेव मंदीर येथे शनिवारी (ता.२६) फेब्रुवारीपासून गुरुवार (ता.३) मार्चपर्यंत महाशिवरात्रोत्सव व रथोत्सव  होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी ३ मार्च रोजी दु. १ वा. रथोत्सव मिरवणूक होणार आहे. यानुसार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवकिर्तनाने महाशिवरात्री उत्सवास प्रारंभ होणार आहे  दररोज सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी व श्रीवाहन मिरवणूक होणार आहे. १ मार्च रोजी महाशिवरात्री एकादशीनिमित्त भव्य आकर्षक फूलांची सजावट व रांगोळीमधून १२ ज्योतिर्लिंग साकारण्यात येणार आहेत. गुरूवार (ता. ३) रोजी १ वा. श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या हस्ते भव्य रथोत्सव मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. यामध्ये जमखंडी बेडकीहाळ बँड, करोशी, धुळगणवाडी कोथळी, करडी ढोल, हनुमान संभळा वाद्य जमखंडी तसेच हत्ती व घोडे यांचा समावेश असणार आहे. रविवार (ता. ६ मार्च) महाप्रसाद आयोजित करण्यात आल्याची माहिती उत्सव कमिटी अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.
—–
विविध स्पर्धा रद्द
जागतिक कोरोना महामारी संसर्गामुळे यावर्षी सालाबाद होणाऱ्या सायकल, मॅरेथॉन स्पर्धा, बैलगाडी, घोडागाडी, डान्स स्पर्धा व लावणी कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. महाप्रसादासाठी ज्या भक्तांना शिधा दान करावयाच्या आहेत. त्यांनी महादेव मंदिर देवस्थान कमिटीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सायकलच्या चाकाला ‘महागाईचा ब्रेक’; जानेवारीपासून चौथ्यांदा दरवाढ

Spread the love  स्पेअरपार्टच्या लहान कंपन्या अडचणीत निपाणी (वार्ता) : इंधन दरवाढ होण्यासह आरोग्यासाठी सायकल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *