Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love

 

धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन

निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दर्गाह येथील महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब (क-स्व.) यांच्या उरूसाला चुनालेपनाने प्रारंभ झाला आहे. सोमवार (ता.१४) ते बुधवार (ता.१६) अखेर मुख्य कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती, कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (ता.४) संत बाबा महाराज मूळ गादी चव्हाणवाडा, दर्गा देवस्थान येथे सनई वादन झाले. शुक्रवारी (ता.११) चव्हाण वारसांच्या हस्ते चुना लेपण रविवारी (ता.१३ ) चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढविण्यात आला.
यावेळी चव्हाण वारस रणजीतसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण सरकार, विवेक मोकाशी, शरदचंद्र मळगे, सनी साळुंखे, अतिश सुतार, सदोबा डवरी, दत्ताजी रावळ, दिलीप रावळ, प्रदीप रावळ व साळी समाज उपस्थित होते. शिवाजी आंबले, संभाजी आंबले व आंबले परिवार यांचेकडून चव्हाण वाडा येथे निशाणी काठीचे आगमन झाले.
सोमवारी (ता.१४ ) गंध रात्र सुरू चव्हाण वाड्यातून पहाटे गंध मिरवणुक असून बेडीवाल्यांचा उरूस साजरा होणार आहे.
मंगळवारी (ता.१५ ) चव्हाण वाड्यातून गेलफ, भर व ताजा उरूस, बुधवारी ( ता.१६) सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत खारीक उदीचा कार्यक्रम व शिळा उरूस होणार आहे. गुरुवारी (ता.१७)
मानाचे फकीर रवानगी आणि भंडारखाना, शुक्रवारी (ता.१९) चव्हाण वारस व मानक-यासह पाकळी कार्यक्रम, दर्गा देवस्थान व संत बाबा महाराज चव्हाण समाधीस अभिषेक गोडा नैवेद्य, आणि मानाच्या फकरांची रवानगी होणार आहे.
उरुसानिमित्त सोमवारी (ता.१४) व मंगळवारी (ता.१५) रात्री आठ वाजता चव्हाणवाडा जिजामाता चौकात आतषबाजी होणार आहे.
उरुसानिमित्त मंगळवारी (ता.१५ ) अंमलझरी रोडवरील आंबेडकर नगरात विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या विना लाठी-काठी बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १०००१, ७००१ व ४००१ रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ७००१, ४००१ व ३००१ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहेत. रात्री ९ वाजता दर्गाह मंडप येथे इचलकरंजी आणि शहापूर येथील कव्वालांची जुगलबंदी होणार आहे.
बुधवारी (ता.१६) म्युनिसिपल हायस्कूलमधील संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदानात दुपारी तीन वाजता कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लहान, मोठ्या १०० पेक्षा अधिक कुस्त्या होणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *