राजू पोवार; चांद शिरदवाडमध्ये जागृती मेळावा
निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. तर कारखानदाराकडूनही ऊसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे ऊसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे. त्यासाठी ऊस दरासाठी जागृत होऊन सर्व शेतकऱ्यांनी जात पात -पक्ष विसरून एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
चांद शिरदवाड येथे आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जागृती मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णा पाटील (पोलीस पाटील) उपस्थित होते.
यावेळी रयत संघटनेच्या निपाणी तालुका अध्यक्षपदी सुनील पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मेळाव्यास संजू पाटील, सतीश पाटील, जाफर मुजावर, प्रदीप पाटील, सुभाष पाटील. अण्णासाहेब किनिंगे, सैनिक पाटील, नानासो पाटील, रमेश लकडे, इकबाल मुजावर, चौगोडा पाटी, गुंडा चौगुले, रजनीकांत पाटील, देवेंद्र पाटील, अर्जुन आंबी, अशोक मोरे, शांतू डूनुंग,सागर हवेली, सुरेश चौगुले, राकेश पाटील,पोपट मड्डे, बबन जामदार, एकनाथ सादळकर, राजू कोपार्डे, दादासो वरुटे, बाबासो पाटील यांच्यासह चांद शिरदवाड परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta