निपाणी (वार्ता) : येथील आर्केडिया गणेशोत्सव मंडळातर्फे
नितिनकुमार कदम मूकबधीर निवासी विद्यालयातील दिव्यांग मुलांसाठी साउंड सिस्टिमची भेट देण्यात आली. जहाजावर जीवन जगणारे लोक आणि त्यांनी दिव्यांग मुलांप्रती असणारा प्रेम जिव्हाळा या भेट वस्तुतून दिसून आला.
मुख्याध्यापिका पंकजा कदम यांनी स्वागत केले.
पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, प्रत्येक व्यक्तीने समजभान जपले तर दिव्यांग मुलाच्या आयुष्यात नक्कीच आमुलाग्र परिवर्तन होईल. डी. जे. डॉल्बीला फाटा देऊन समाजोपयोगी कार्य करावे, असे आवाहन केले. भेट वस्तुसाठी नितीन कनोजिया, विश्वनाथ चौगुले, सौरभ पाटील, सुबोध नाईक, दीपक हिंगसे यांनी आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रमास विशाल मोरे, एकनाथ कुंभार, विश्वनाथ चौगुले, सचिन हासबे, नितीन पानारी, अधिक्षिका मनीषा कदम, ज्योती मेंडगुदले, दिपाली माने, अर्चना आवळे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.