राजू पोवार : रायबागमध्ये रयत संघटनेची बैठक
निपाणी (वार्ता) : यंदाच्या गळीत हंगामात अनेक कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. याउलट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश धुडकावून कारखाने सुरू केले आहेत. याशिवाय पूर परिस्थितीमुळे सोयाबीनसह इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची अजूनही अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, यासह विविध समस्या घेऊन ९ डिसेंबर पासून होणाऱ्या बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात १६ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. रायबाग येथील शासकीय विश्रामधामात आयोजित रयत संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, ऊस तोडणी हंगाम काळात मुजराकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शिवाय वाहतूकदार एन्ट्री घेऊनच वाहने शेतातून बाहेर काढत आहेत. अशा प्रकारची पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी विधानसभा भावनासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय अतिवृष्टी आणि महापूर काळात ऊस सोयाबीन भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. पण त्याच्या भारतापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. त्यांना तात्काळ भरपाई मिळावी, अन्यथा अधिवेशन काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पोवार यांनी दिला.
बैठकीस संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नापा पुजारी, वासू पंढरोळी, मल्लाप्पा अंगडी, रमेश कल्लूर, गजानन पुजारी, मायाप्पा पुजारी, रमेश चौगला, सुनील पुजारी, रमेश चौडाई, कल्लाप्पा खोत,पप्पू पुजारी, वासू चौडाई, चिदानंद मिस्त्री त्यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta