निपाणी : विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच या जगाचा खरा आधारवट आहे. राष्ट्रपुरुष आणि भारतमाता यांच्याप्रती हिंदू तरुण- तरुणींनी श्रीराम भक्त हनुमंतांप्रमाणे अंतरात उत्कट भावभक्ती जागवल्यास तिचा जागर मनात निश्चितपणे अनुभव करता येईल. या उत्कट भक्तीची शक्ती उरात जागवून भारतमातेच्या रक्षणास, सेवेस पात्र होऊया, तसेच कार्तिकी दिपउत्सवचे भारतीय भारतीय संस्कृतीमधील महत्त्व तसेच अध्यात्मातील महत्व यावेळी प. पू. अरुणानंद तीर्थ स्वामी या यावेळी मार्गदर्शन करत वेळी सांगितले.
यावेळी सद्गुरु सच्चिदानंद बाबा यांनी जमलेल्या तरुण-तरुणींना आपल्या देशासाठी या धर्मासाठी ज्यांनी ज्यांनी त्याग व बलिदान दिले आहेत त्यांना मोबाईल वरून स्टेटस, व्हिडिओ, रिल्स, फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सअप, वरून भक्ती न दाखवता भारत मातेची सेवा करून समाजातील लोकांची सेवा करून ती कृतीतून व आचरणतून आणून राष्ट्रपुरुषांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी आसे आव्हान यावेळी प. पू. सद्गुरू सच्चिदानंद बाबा यांनी केले. प.पू.प्राणलिंग स्वामीजी व प.पू. बसव मलिकार्जुन स्वामीजी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे विश्व हिंदू परिषद, हिंदू हेल्प लाईन निपाणी, दुर्गा वहिनी, मातृशक्ती आणी सकल हिंदू समाज निपाणी यांच्या वतीने कार्तिक दीपोत्सव उत्साहात पार पडला. सर्वप्रथम धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी सुमारे 1100 दिवे प्रज्वलित करून मनोभावे राष्ट्रभक्तीची आराधना करीत दिपोत्सव साजरा केला. दीपोत्सवात दिपप्रज्वलित करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण- तरुणींनी यांनी चौकात गर्दी केली होती. यावेळी विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष प. पू. प्राणलिंग महास्वामीजी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्री दत्त पीठ तमन्नाकवाडा येथील प. पू. प्राणलिंग स्वामीजी, ओम शक्ती मठ शेंडूर येथील श्री श्री श्री अरुणानंद तीर्थ स्वामीजी, दानम्मादेवी मठ निपाणी येथील श्री बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात साजरा करण्यात आला यावेळी निपाणी येथील प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत तारळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानंतर जमलेला तरुण तरुणींनी दिवे प्रज्वलित केले. त्यामुळे धर्मवीर चौक परिसर उजळून निघाला होता. दिपोत्सवाबरोबर दुर्गा वहिनीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
दिवे, रंगीबेरंगी रांगोळ्या यामुळे चौक परिसरात झगमगाट झाला होता. दिपोत्सवामुळे चौकात देशभक्तीमय वातावरण झाले होते. दीप प्रज्वलित करताना तरुण तरुणींनी देशभक्ती पर घोषणा देवून परिसर दनदावून सोडला. यावेळी सागर श्रीखंडे यांनी प्रस्तावित केले. आभार दीपक भडगाव यांनी मांडले.
यावेळी मातृशक्तीच्या जिल्हाध्यक्ष सुचिता बाई कुलकर्णी, दुर्गा वहिनीच्या प्रमुख श्वेता ताई हिरेमठ, शिवानी पाटील, कादंबरी दिवेकर, तनुजा कांबळे, सिध्दी पुजारी, मयुरी कांबळे, तन्वी परिट, संजना गोंजली, जयश्री सावंत, अनुषका रावण, हिंदू हेल्प लाईन निपाणीचे आकाश स्वामी, स्वप्निल काशीदकर, अभिजीत सादळकर, रवी रेडेकर, आकाश मलाडे, तसेच बुगटे अलुर, हिटनी, शिपुर, मतीवडे, शिरगुप्पी, पांगिर गोदूगुपी, शेंदू, कोडणी, यमगरणी, बुदिहाळ, नांगनुर, कोगनोळी, निपाणी परिसरील मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी उपस्थित होता.