सहकाररत्न उत्तम पाटील ; विविध विकास कामांचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : पट्टण पंचायत निवडणूक होऊन बराच काळ उलटला. पण अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी रखडल्या होत्या. परिणामी म्हणावी तशी विकास कामे करता आली नाहीत. गतवेळच्या सभागृहावेळी बेळगाव जिल्ह्यात बोरगाव येथे जादा निधी आणून विकास कामे राबवली होती. आता निवडी झाल्या असून विकास कामांची घोडदौड सुरू होणार आहे. पट्टणपंचायतीसाठी नेतेमंडळींच्या सहकार्याने पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून लवकरच सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती सहकार रत्न उत्तम पाटील यांनी दिली. गुरुवारी (ता.५) बोरगाव येथे आयोजित विविध विकास कामांचा प्रारंभ करून ते बोलत होते.
नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी स्वागत केले. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू कांबळे, उपाध्यक्षा भारती वसवाडे यांच्यासह नगरसेवक आणि मान्यवरांच्या हस्ते एसएफसी फंडातून मंजूर झालेल्या ३२ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीतून गटारी व इतर कामांचा कुदळ मारून प्रारंभ करण्यात आला.
उत्तम पाटील म्हणाले, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह जारकीहोळी बंधूंचे विविध विकास कामांच्या निधीसाठी सहकार्य लाभले आहे. जुन्या ग्रामपंचायत कार्यालयातच पट्टण पंचायतीचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. रुबाब लक्षात घेऊन शासनाकडून घरी निधी मंजूर करून आणला आहे. पुढील पाच वर्षात पट्टण पंचायतीच्या माध्यमातून बोरगावचे नंदनवन करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास नगरसेवक दिगंबर कांबळे नगरसेविका संगीता शिंगे, पट्टण पंचायत आयुक्त स्वानंद तोडकर, किरण शिंगे, भूषण मधाळे, शकील अफराज, मुसा अफराज, राजू अफराज, राजू गजरे, राजू शिंगे, अमर शिंगे, अश्विनकुमार मानवी, नितीन कुरळे, भैय्या अफराज, तुषार कांबळे यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.