
श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आयोजन; भारती झालेल्या जवानांचाही सत्कार
निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या येथील शाखेतर्फे आयोजित तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेत अक्कोळ येथील धर्मवीर संभाजी नगरातील शिवशंभू ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला.
गळतगा येथील सार्थक संजय जाधव गळतगा आणि अक्कोळ येथील श्रावणी संदीप सदावर्ते यांनी विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. अक्कोळ छत्रपती संभाजीनगर येथील दुर्गप्रेमी मावळे आणि खडकला देखील मल्हार मार्तंड जाधव यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकाविला.
निपाणी येथील दत्त गल्लीमधील दक्षता तरुण मंडळ आणि कुरली येथील शिवशक्ती मित्र मंडळाने विभागून चतुर्थ क्रमांक पटकाविला. तर निपाणी हुडको कॉलनीतील प्रतीक कोरी यांनी पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले. निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भावनात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत भिवशी येथील शिवशंभो बॉईज यांनी बक्षीस पटकाविले. उत्कृष्ट माहिती सादरीकरणामध्ये अक्कोळ येथील छत्रपती संभाजी नगरातील दुर्गप्रेमी मावळे मंडळांनी बक्षीस मिळविले. सहभागी प्रत्येक स्पर्धकांना सन्मानचिन्ह व मानपत्र देवून गौरविण्यात आले.
व्हिडिओ आणि फोटो चित्रीकरण स्पर्धेत निपाणी येथील आयफोन कलाकार प्रथमेश पाटील यांनी प्रथम येथील गिरी फोटोग्राफी, ड्रोनवाला यांनी द्वितीय तर येथीलच अभिषेक औंधकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमात सैन्यदलात नव्याने भरती झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजेंद्र तारळे, डॉ. सचिन काटकर, प्रवीण वसेदार, महेश दिवाण, अभयकुमार कोठाडीया, श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष ॲड. निलेश हत्ती यांच्यासह पदाधिकारी, शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta