निपाणी (वार्ता) : सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज व दत्त संस्थान ट्रस्टी अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदिच्छा भेट देऊन पंतप्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. बाळेकुंद्री यांनी, महाराष्ट्रातील व भुदरगड तालुक्यामध्ये विविध योजना, मंदिर अनुदान, सर्वसामान्याना सर्वोत्तम आरोग्य सुविधा व निरंतर समाज उपयोगी सेवाआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रभावीपणे राबविल्या असल्याचे सांगितले. त्यांचेलहान भाऊ व कोल्हापूर डीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनीही डॉ. संजयपंत बाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. अक्कोळ ग्रामपंचायततर्फे अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, वीरेंद्र पाटील, रणजीत सदावर्ते व ग्रामपंचायत सदस्यांतर्फेही मंत्री आबिटकर त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी योगेश पाटील (बारवे), चंद्रकांत सुतार (गारगोटी), अनंत पवार (लिंगनूर), रामनारायण कुलकर्णी, दिलीप सदावर्ते, आप्पासो चिंचवाडे, रमेश कुलकर्णी, चंद्रकांत पाटील (कौलगे), सागर शिंदे (भुदरगड), अरुण दाभोळे (वाघापूर) श्रीपती सुर्यवंशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.