हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथील सार्थक उत्तम नलवडे याची सर्वात कमी वयात इंडियन अग्नीवीरमध्ये निवड झाल्याबद्दल
त्याचा आडी हंचिनाळ ग्रामपंचायतच्या वतीने पंचायतीच्या पीडीओ सौ. पद्मजा जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
हंचिनाळ गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्याच प्रयत्नात अवघ्या वयाच्या साडे सतराव्या वर्षी ना कोणते प्रशिक्षण, ना विशेष मार्गदर्शन, केवळ जिद्द मेहनत आणि प्रयत्न व व देश सेवा करण्याची तीव्र इच्छा या जोरावर सार्थकची अवघ्या साडे सतराव्या वर्षी निवड झाली आहे. त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण विशेष नवा रेकॉर्ड केल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत
एसडएएए श्री. संतोष वाडेकर, श्री. अनिल पोतदार, क्लर्क सागर ऐतवडे, प्रकाश पाटील, सौ. पौर्णिमा लोहार, ग्राम सहाय्यक मित्र अमृता पाटील उपस्थित होते.