
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका, युवा समिती निपाणी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा व रेणुका मंदिर येथील उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा तसेच हालसिद्धनाथ मंदिर येथील उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील आपले मनोगत व्यक्त करतेवेळी निपाणी तालुक्यातील सर्व पालकांनी ग्रामीण व शहरी विभागातील सर्व मुला-मुलींना मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा भाषा व संस्कृती वाचवण्यासाठी निपाणी तालुक्यातील सर्व मराठी भाषिक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश हा मराठी शाळेत घ्यावा. आपली भाषा व संस्कृती वाचवणे हे सर्वांचेच प्राथमिक जबाबदारी आहे. यावेळी उपस्थित निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती मीडिया व खजिनदार नेताजी पाटील आमचे मार्गदर्शक के. डी. पाटील, कार्यकारी किरण मगदूम उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta