
दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बुवा होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाळा सुधारणा कमिटी सदस्य श्री उदय मारुती पाटील यांचा वाढदिवस शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. त्यांच्याकडून पहिली ते सातवीच्या मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
पाटील पुढे म्हणाले, मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारणा व कला गुणांना वाव मिळावा या हेतूने असे गोड कार्यक्रम होत राहणार आहेत. मुला-मुलींनी अभ्यास लक्ष केंद्रीत करावे, टीव्ही, व मोबाईलचा वापर टाळावा, असे ते बोलत होते. यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुरेश अस्वले व अध्यक्ष शिवाजी बुवा यांनी आपल्या मनोगत मांडले. या कार्यक्रमला शिक्षिका मीनाक्षी गुरव, ललिता बडगेर, शाळा सुधारणा कमिटी सदस्य आनंद पाटील, योगेश सुतार, सदस्य, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रदीप शेंडे यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta