श्री संत बाळूमामा दूध संस्था मुमेवाडी यांच्यामार्फत दूध उत्पादकांना नॉनस्टिक कढई वाटप त्याचबरोबर दहावी व बारावी तसेच आठवी शिष्यवृत्ती अबॅकस मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे चेअरमन यांनी संस्थेची स्थापना केव्हा झाली. त्याचबरोबर संस्थेची स्थापना वेळेची संकलन आत्ताचे संकलन त्याचबरोबर बोनस विषयी माहिती त्याचबरोबर दूध उत्पादकांना दिला जाणाऱ्या सोयी सुविधा याचा लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला. त्याचबरोबर 2024-25 या वर्षातील दोन लाख बत्तीस हजार गणेश ठेव वाटप करण्यात आली. त्यानंतर गोकुळचे संकलन अधिकारी कोले साहेब यांनी दुग्ध व्यवसाय विषयी मार्गदर्शन केले तसेच गोकुळच्या उत्तूरकर मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व डि. के. परीट सर यांनीही दुग्ध व्यवसायाशी निगडित विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. जी. काटे सर यांनी संस्थेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला. उत्पादकांनी उत्पादकांच्या साठी चालवलेली दूध संस्था असा उल्लेख केला. सदर कार्यक्रमास गावातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उद्योजक मुंबई मंडळाचे कार्यकारणी गावातील विविध संस्थातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संत बाळूमामा दूध संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सन 2024 25 या वर्षात संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय विभागातील पहिल्या तीन दूध उत्पादकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी नितीन काटे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे व्हॉइस चेअरमन संतोष शिवराम काटे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta