उरूस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई- सरकार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित येथील श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा उरूस बाबा महाराज चव्हाण यांच्या वारसांच्या तर्फे श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा भव्य उरूस शुक्रवार पासून ( ता. ३) ऑक्टोबर ते रविवार (ता. ५ ऑक्टोबर) साजरा होणार आहे. तरी नागरीक व भाविकांनी सहकार्य करून उरूस उत्साहात व शांततेने पार पाडण्याचे आवाहन उरूस कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी केले.
शनिवारी (ता. १५) आयोजित उरूस कमिटी बैठक आणि भित्तीपत्रकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब देसाई म्हणाले, मंगळवारी (ता. २३ सप्टेंबर) श्री संत बाबामहाराज चव्हाण मुळगादी चव्हाणवाडा व दर्गा देवस्थान येथे ताशा, सनई वादनासह उरूस कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे.
मंगळवारी (ता. ३०) चव्हाण वारसांच्या हस्ते चुना चढवणे.गुरूवारी (२ ऑक्टोबर) चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढवणे.
शुक्रवारी (ता. ३) गंधरात्र असून गंध चव्हाण वाड्यातून पहाटे मिरवणूकीने निघेल. याच दिवशी बेडीवाल्यांचा उरूस साजरा होणार आहे.
शनिवारी (ता.४) भर उरूस असून चव्हाण वाड्यातून मिरवणूकीने येणारा गलेफ पहाटे चढविणेत येईल. याच दिवशी ताजा उरूस भरणार आहे. रविवारी (ता.५) सकाळी ७ सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिजामाता चौकातील चव्हाण वाडा येथे खारीक उडीसा कार्यक्रम होणार असून याच दिवशी शिळा उरूस भरणार आहे.
सोमवार (ता.६) मानाच्या फकीरांची रवानगी व भंडारखाना होईल.
बुधवारी (ता.८) चव्हाण वारसदार व मानकरी लवाजम्यासह दर्गा देवस्थान येथे पाकळणी कार्यक्रम होणार आहे. याशिवाय संत बाबामहाराज चव्हाण समाधीस अभिषेक व गोडा नैवेद्य दाखवून मानकऱ्यांच्या रवानगीने पुरुषाची सांगता होणार आहे.
शुक्रवार आणि शनिवारी रात्री ८ वाजता जिजामाता चौकातील चव्हाण वाड्यात आतिषबाजी होईल. रात्री अहमदनगर येथील शाहिद अजमेरी कव्वाल पार्टी आणि मिरज येथील रेश्मा ताजकव्वालन पार्टी यांच्यात कव्वालीची जुगलबंदी रंगणार आहे.
यावेळी उरूस कमिटीचे उपाध्यक्ष संजय माने, जयराम मिरजकर, सुजय देसाई, राजूबाबा निपाणीकर, संग्राम देसाई, विवेक देसाई, रणजीत देसाई, शरद मळगे, बाळासाहेब पोतदार, प्रभाकर पाटील, माजी नगरसेवक सुभाष कांबळे, उदय माने, अतिशय शिंदे, निलेश पावले, सुजित गायकवाड, सचिन काटकर, युगेंद्र शहा यांच्यासह उरुस कमिटी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta