नगराध्यक्षा सोनल कोठडीया; निपाणी नगरपालिकेती बैठकीत निर्णय
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. आंबेडकर विचार मंच व विविध संघटनेच्या वतीने सात वर्षांपूर्वी आंदोलन करून मिळवलेले वाचनालय केवळ तांत्रिक अडचणीमुळे आजतागायत रखडलेले होते. ते पूर्ण करून सुसज्ज ग्रंथालय निर्माण करू असे आश्वासन नगराध्यक्षक्षा सोनल कोठाडीया यांनी दिले. येथील नगरपालिकेमधील दिवंगत नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे सभागृहात गुरुवारी (दि. २५) सायंकाळी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी डॉ. आंबेडकर विचार मंचसह विविध संघटनेच्या वाचनालय हस्तांतराची मागणी केली होती. ज्यावेळी या वाचनालयाची मागणी झाली त्यावेळी आपण नगराध्यक्ष असताना असताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ही प्रक्रिया थांबली होती. शहरवासीयांच्या दृष्टीने ही दुर्दैवाची बाब आहे. वाचन संस्कृतीमध्ये भर घालत असताना केवळ एका समाजाने मागणी करणे हे सामाजिक दृष्ट्या संकुचित वाटले. या वाचनालयाला डॉ. आंबेडकरांचे नाव असले तरी सर्व जाती धर्माचे वाचक या ठिकाणी वाचनाने परिपूर्ण होणार आहेत. त्यासाठी या वाचनालयाचे तांत्रिक अडचण दूर करून हे वाचनालय, ग्रंथालय विभागाला त्वरित हस्तांतरण करण्यासाठी आपणाससह नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतल्याचे सांगितले. ग्रंथालय विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या संदर्भात तात्काळ सुसज्ज वाचनालय निर्माण करण्याची ग्वाही दिली.
डॉ.आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी, डॉ. आंबेडकर विचार मंचने वाचनालयाचे मागणी करणे हे प्रगतीचे लक्षण आहे. शहर हे वाचन संस्कृतीने सुसंस्कारित व्हावे, यासाठी आम्ही मागणी त्याची पूर्तता नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी पूर्ण केल्याचे सांगितले.
यावेळी महेश सूर्यवंशी, सागर मिरजे, राजेश कोठडीया, किसन दावणे, गणू गोसावी, दलित पॅंथर सेनेचे संदीप माने, अविनाश माने, पिंटू माने, प्रवीण सौंदलगे, आरेश सनदी, प्रवीण माने, संदीप माने, विवेक कांबळे, रमेश कांबळे, धनानंद कांबळे, कैलास ढाले, दीपक शेवाळे, प्रतीक मधाळे, अभिजीत कांबळे, पंकज वराळे, सनी माने यांच्यासह दलित समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta