

निपाणी उरूस : फकिरांसह मानकऱ्यांकडून अर्पण गलेफ
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे दर्गाहचे संस्थापक संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचे निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवलिहाळकर सरकार, दादाराजे देसाई-निपाणकर सरकार यांच्या हस्ते लवाजमा मानाचे फकीर व मानकरी यांच्या उपस्थितीत अर्पण करण्याचा विधी पार पडला.
उरूसानिमित चव्हाण वारस यांच्या हस्ते भर उरुसादिवशी मानाच्या चव्हाण वाड्या मधील समाधी स्थळाहून भंडार खान्याचा नैवेद्य नेला. चव्हाण वारससाजित देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण व मानकरी सव्याजम्यासह दर्गा मंडपमध्ये जाऊन गादीस नैवेद्य दाखवून मानाच्या फकिरांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर मूळ गादी चव्हाण वाडा येथे चव्हाण वारस पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते खारीक, उदी वाटपाचा कार्यक्रम झाला.
यावेळी कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, संग्राम देसाई, रणजीत देसाई- सरकार, संजय माने, सुजय देसाई, राजूबाबा निपाणकर, विवेक मोकाशी, शरद मळगे, प्रभाकर देसाई, संभाजी मुगळे, शरद बुडके, विश्वास माळी, अतिश शिंदे, सदाशिव डवरी, जयराम मिरजकर यांच्यासह मानकरी व भाविक उपस्थित होते.
——————————————————————–
श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांच्या भर उरूसा निमित पहाटे ३ वाजता गंध चव्हाण वाडा समाधी स्थळा हून वाजत गाजत सर्व मानकरणच्या समवेत दर्गाहमध्ये जाऊन गंध चढवण्यात आला. यावेळी रणजित देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रमेश देसाई सरकार, बाळासाहेब देसाई, सरकार पृथ्वीराज चव्हाण, स्वर्गीय दत्ताजीराव घोरपडे, नवलीहळकर सरकार यांचे नातू संताजीराजे घोरपडे नवलिहाकर सरकार व नवलिहाळकर मानकरी लवाजम्यासह उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta