

कुटुंबाचा आनंद झाला द्विगुणीत : मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : ‘घरी मुलगा किंवा मुलीचा जन्म होणे’ ही सर्वांसाठीच आनंदाची बाब असते. त्यातच शक्ती आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाच्या दिवसांतील मंगलमय वातावरणात जन्म होणे म्हणजे सुवर्ण क्षणच मानला जातो. अशाच नवरात्रीतील नऊ दिवसांच्या मंगलमय वातावरणात चिक्कोडी तालुक्यात ९६ महिलांचे प्रसूती झाले आहे. त्यामध्ये ४९ मुले तर तब्बल ४७ मुलींचा जन्म झाला आहे. नवरात्रीत चक्क घरी दुर्गाच जन्मल्याने आनंदाचे वातावरण कुटुंबियां मध्ये पसरले आहे.
काही वर्षात ‘बेटी बचाओ’ महिलांचे शिक्षण व सबलीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असल्याने मुलींच्या जन्माचे आता स्वागत करण्यात येत आहे. सोमवार (ता. २२ सप्टेंबर ) ते मंगळवार (ता. २ ऑक्टोंबर) या नवरात्रोत्सवाच्या काळात चिक्कोडी तालुक्यात एकूण ९६ मुला-मुलींचा जन्म झाला. यात ४७ मुली तर ४९ मुलांचा समावेश आहे.
तालुका रुग्णालयात शहर आणिग्रामीण रुग्णालयात या प्रसूच्या झाल्या आहेत. नवरात्रात मंदिरात मांडलेल्या देवीच्या मूर्ती जशा सुंदर असतात, तशाच समाजाच्या वेगवेगळ्या रूपात, घराघरांत, मनामनांतही अनेक दुर्गांनी जन्म घेतला आहे. सध्याच्या काळात दुर्गा केवळ पुराणातली देवी नाही. ती महिला जी घर, ऑफिस आणि समाज या सगळ्या जबाबदाऱ्या एकहाती पेलते, ती मुलगी जी शिक्षणासाठी समाजाच्या बंदिस्त चौकटी तोडते, ती आई जी आपल्या लेकराच्या भविष्याकरिता जगाशी दोन हात करते आणि ती मुलगी जी छळ, अन्याय, दुःख सहन करीत करीत एक दिवस गर्जना करीत उभी राहते. त्यामुळे आता मुलींच्या जन्माचा उत्साव मानल्या जात आहे.
——————————————————————–
चिक्कोडी तालुक्यात तालुका, शहर आणि ग्रामीण रुग्णालयात एकूण ४७ मुलींचा नवरात्रोत्सव काळात जन्म झाला आहे.
रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी आमची टीम प्रयत्नशील आहे. समाजात दोन वर्षापासून मुलींच्या जन्माला महत्व आले आहे. शिवाय मातेसह मुलींना विविध शासकीय सुविधा दिल्या जात आहेत. परिणामी समाजात आदर्श बदल होत आहे. कन्या म्हणजे नवजीवनाचा प्रकाश आणि ती आपल्या समाजाचा भविष्यकालीन आधार आहे. त्यामुळे आमचा विभागही जनजागृती करत आहे.
– राजेंद्र खनदाळे, तालुका शाल्य चिकित्सक, चिक्कोडी.

Belgaum Varta Belgaum Varta